माझ्यामते तरी आपल्याला भाषावार प्रांतरचनेचा फायदाच झाला आहे.

१. मुळात एकाच विचाराची आणि आचाराची लोकं पुर्वीपासून (भारताची स्थापना कैक वर्षांपुर्वी झालेली आहे हो, १९४७ ला इंडिया अस्तित्वात आला!) एकत्र राहत होते त्यांची फाळणी करण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे संस्कृतीजतन आपोआपच झाले. (इथे संस्कृती म्हणजे त्या त्या भागातल्या (सर्व जातिधर्मातल्या) चालीरिती वगेरे वगेरे.)

२. भाषांचे वैविध्य राहण्यास मदत झाली. (माझ्यामते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे.) भाषेवर सर्वात जास्त आक्रमण लोकांच्या स्थलांतरामुळेच होते. मग हे स्थलांतर परप्रांतियांचे स्वप्रांतात असु देत किंवा स्वकियांचे परप्रातांत असु देत, दोन्ही वेळा परिणाम (चांगला-वाईट) भाषेवरच होतो.

           आर्थिक पातळीवर भाषावार प्रांतरचनेचा काही फायदा-तोटा झाला असावा का ह्याबद्दल मला शंकाच आहे. कारण व्यवहारात भाषेपेक्षा तुमची गरज महत्वाची आहे.