हिंदूनी आपणहून कुठल्या परधर्मियांना त्रास दिला आहे?

याची काही गरज होती का? स्वधर्मीयांना छळण्यात हजारो वर्षे घालवली तेवढे पुरेसे नाही काय? तेवढे केल्यावर परधर्मीयांना छळण्याचे फारसे त्राण उरले नसावे.

हिंदूंची हीच तर खासियत आहे! इतरधर्मीय परधर्मीयांना (कदाचित बाटवण्याच्या आणि त्यातून धर्मविस्ताराच्या उद्देशाने?) त्रास देतात. हिंदू (कदाचित धर्मविस्तार वगैरेंच्या भानगडीत पडत नसल्याने) परधर्मीयांच्या वाटेला जात नाहीत. स्वधर्मीयांनाच पिडतात.

(ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना - विशेषतः तथाकथित [ब्राह्मणांनीच किंवा सवर्णांनी ठरवलेल्या] अस्पृश्यांना दिलेल्या वागणुकीचे तर सोडाच, ती फार पुढची गोष्ट झाली. ब्राह्मणांनी ब्राह्मणांनाच काय कमी छळले आहे? (किंवा, to make the statement more politically correct or palatable, खुद्द ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या हातून काय कमी छळ सोसला आहे? ज्ञानेश्वरांचे काय झाले? आगरकरांचे काय झाले?)