पहिली गोष्ट महणजे हिंदू धर्म आवडत असल्यास का आवडतो त्याची कारणे विचारली आहेत. कुणाला आवडत नसला तर त्याची कारणए जाणून घेण्याची जबाबदारी दिसत नाही.

आता मूळ प्रशना विषयी.

धर्म ही काही दुकानात विकत मिलणारी गोषट नाही. आवडते म्हणून घेतली. दुसारी आवडली की ती घेतली

माझा जो धर्म (हिंदू किंवा जो काही) आहे तो आहेच! आवडीनिवडीचा प्रश्न नाही. आणि दर दोन दिवसानी तो चाम्गला आणि इतरांहून श्रेष्ठ कसा आहे (की जे मला आधीच माहीत आहे) त्याची रेकॉर्ड निरनिराळ्या बकवास चर्चांमधून मला कुणी ऐकवण्याची गरज नाही. ती सर्वात वीट आणि उबग आणणारी गोष्ट आहे. अमूक करा आणि तमूक करू नका असे कुणी शिकवलेले नाही; शिकवण्याचा अधिकर नाही. ज्याने त्याने 'स्वधर्माने' आचरण करावे अशी शिकवण आहे. त्यामुळे कुठल्याही धार्मिकाने त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे आचरण केले तरी तो ह्या व्याखेने हिंदुच ठरणार की!

ज्याला धर्माची महती सांगायची आहे त्यांनी ती इतरधर्मियांना सांगावी, आणि विचारावे, धर्म आवडला का नाही म्हणून.