टग्याची सगळी मतं जमेला ...
त्याचबरोबर प्रांतीयता फ़ारच बळावली. राष्ट्रीय भावनेचा, पर्यायाने अस्मितेचा, भाषा-संस्कृतीचा आणि आता राजकीय पक्षांचा निव्वळ बोऱ्या वाजला आहे.
आजच्या घडीला सगळे प्रांतीय पक्ष राष्ट्रीय राजकारण वेठीला धरताना दिसतायत. द्रमुक, टीडीपी वा सेनेसारख्या पक्षांना 'आपल्या' लोकांसाठी भांडत असताना सुदूर आणि क्षीण पूर्वांचलाच्या वा सिक्कीम, हिमाचल, ओरिसाच्या कल्याणासाठी आपले काही मुद्दे बाजूला ठेवावेत वगैरे विचार सुचणं आणि आचरणं केवळ अशक्य आहे.
आपण मराठी लोक देशातल्या देशात महाराष्ट्राच्या बाहेर पडायला फ़ारसे उत्सुक नसलो तरी हार्डकोअर 'प्रांतीय' नाही. पण मद्रास-कलकत्त्यात राहायची पाळी आलेल्यांना प्रांतीयता म्हणजे काय ते झट्कन उमगावं.
भाषावार प्रांतरचना भारताला फ़ळली नाही हेच खरं. खरं तर त्या त्या भाषांना तरी किती फ़ळली देव जाणे.