<मिलिंद , आपण दिलेली माहिती तर केवळ धक्कादायक आहे.>

जीवन,

ही घटना अत्यंत लाजिरवाणी असली तरीही संपूर्णपणे खरी आहे, यात अतिशयोक्ति अजिबात नाही. या मुद्यावर भाजपने संसदेत आक्षेप घेतला व कधी नवे ते डावे व समाजवादी यांनीही सरकारला धारेवर धरले. काँग्रेस सरकरने नेहेमीच्याच कोडगेपणे 'असे होय? आम्हाला माहित नाही, याची चौकशी करू' असे आश्वासन दिले आहे. उल्लेखीलेल्या पुस्तकांबरोबरच इतर शालेय पुस्तकात जातीवाचक तसेच काही गलिच्छ व निदान लहान मुलांनी वाचू नयेत असे शब्दही आहेत. परवा रात्री संसदेत प्रश्न विचारला गेला तेव्हा सदर पुस्तके व त्यातील अधोरेखीत केलेला मजकूर सर्वांनी पाहीला.

जे लोक मुरली मनोहर जोशींवर भगवेकरणाचा आरोप करत होते ते देशभक्तांना बदनाम करत आहेत. म्हणजे जे पूर्वी घडले तेच आता होत आहे. गांधी व नेहेरू ही दोन नावे मते मागण्यासाठी लोकांपुढे ठेवून क्रांतिकारकांना नामशेष करण्याचा हा प्रयत्न हिटलर कालीन गोबेल्स प्रणालीपेक्षा भयंकर आहे. हे शिकलेली मुले साहजिकच देशभक्त म्हणून गांधी नेहेरूंशिवाय इतर कुणालाच ओळखणार नाहीत. व यापुढेही मॅडम ना केवळ नावाखातर मते जमा करणे सोपे जाइल.