बाकी आपला धर्म चांगलाच असतो. मला हिंदू धर्मातली जातिव्यवस्था खूप आवडते.
तसेच हिंदू धर्मात समुद्राचे पाणी गोड करण्याची शक्ती आहे. काही मुस्लिमभाई
इस्लामला त्याचे क्रेडिट देऊ पहात असले तरी ही किमया हिंदू आहे. हिंदू
धर्मातल्या देवांना, देवींना चमचा-चमचा दूध फार आवडते, हे मला आवडते.
तूर्तास इतकेच.
मला इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मही आवडतो. कुणी अशीच उत्तम चर्चा टाकल्यास उत्तम.
दुसरे म्हणजे हिंदुधर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक मनुष्य
परमात्मस्वरूप आहे व साधना करून तो आपल्या परमात्मस्वरुपाचा अनुभव घेऊ
शकतो. पण इस्लामधर्मात खुदा सर्वशक्तिमान परमेश्वर असतो तर मनुष्य हा बंदा
असतो. बंदा हा बंदाच राहतो, त्याचा कधी खुदा होत नाही.
आम्हाला
दोन्ही स्किमा नामंजूर. दुकानदाराने अधिक ऑफ़ सीज़न डिस्काउंटसहित
ग्यारंटी वाढवून दिली आणि ०% टक्के व्याजदराने फायनान्स केला तरी.