घरगुती नात्यांचे वर्णन रांगोळीच्या वर्णनाइतकेच सुरेख आहे.  दिवाळीतल्या शांत आळसावलेल्या दुपारचे वर्णनही चांगलंच जमलंय.. 

लहानपणातल्या दिवाळीचे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले.   माझी मोठी बहीण अशीच रांगोळ्या काढायची.   आम्हा छोट्या बहिणींना मदत करायला घ्यायची, रांगोळीत रंग भरायला द्यायची ती आठवण झाली..  तिच्या लग्नानंतरही काही दिवाळ्या आमच्याकडे रांगोळी काढायला येत असे - सासर माहेर एकाच गावी असल्याने ते शक्यही झालं.  पुढे काही वर्षांनंतर ती जेव्हा हळूहळू सासरी रमायला लागली तेव्हा रांगोळी घालायची जबाबदारी हलकेच माझ्यावर आली. 

"आमचं हे पाहणं वेगवेगळ्या कोनातून होई. वर जिना चढून जाऊन सर्वात वरच्या पायरीवरून बघ, किंवा आपण वरून उतरून येत आहोत आणि अचानक ही रांगोळी समोर आली तर कशी वाटेल त्या दृष्टीने पार चौथ्या मजल्यावरून जिना उतरायला लाग, किंवा घरात जाऊन आपण घरातले होऊन नव्या दृष्टीने रांगोळीकडे बघ, किंवा डोळे किलकिले करून रंगसंगतीचा अंदाज घे, असे वेगवेगळे चाळे करून पाहायचो. "

आवडलं!  असंच सारखं लिहीत राहा..

 

सुहासिनी