राजकारणी लोकांनी कोणत्या गोष्टिचा फ़ायदा उठावला नाही? त्यांचा काहिच भरोसा नसतो. हां, आता भाषावार प्रांतरचनेचा सीमेवर राहणाऱ्यांना त्रास झाला हे मान्य आहे पण तो दोष हा विषय सोडवण्यापेक्षा कुजत ठेवणाऱ्यांचा आहे. (आणि राजकारण्यांना हेच हवे आहे.)
कळप करुन राहणे हा तर आपला नैसर्गिक गुणधर्म आहे. जर असमतोल भाषावार प्रांतरचना झाली असती तर आत्तापेक्षा जास्त ग्रुप्स तयार झाले असते आणि प्रांतिय हार्डकोअरपणा अधिक तीव्र झाला असता. त्यापेक्षा आत्ता बरे चालू आहे.