रांगोळीसारख्या आमच्या लहानपणच्या आठवणी माझ्या लेकीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे सर्व लिहून काढलं होतं. नवऱ्याच्या आणि मैत्रिणीच्या सुचवण्यावरून मनोगतावर लिहिलं. हे लिखाण एकटाकी झालं होतं, तेव्हा त्यात थोड्याफार व्याकरणाच्या चुकाही होत्या. आपण लिहिताना, बोलताना, सांगताना बिनचूक असावं असा माझ्या मनोगती नवऱ्याचा कटाक्ष असतो. आणि काही प्रमाणात मला ते जमलं नाही, तरी त्या विचारांचा मला आदर आहे. या भावनेनं व्याकरणाच्या चुका दुरुस्त करूनच या आठवणी प्रकाशित केल्या.

मिळालेल्या सर्व प्रकारच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

- चिमण