भारत नावाचा देश असता का ?
हा प्रश्न मला वाटते जरा हटके आहे. वर रंग दिल्यप्रमाणे तो भगवा असता कां/चाणक्यांच्या स्वप्नाप्रमाणे असता कां/असे प्रश्न विचारात घ्यावेसे वाटते. २००/५००/१००० वर्षा नंतरची परिस्थिती कल्पणे अवघड/अश्क्य.चाणक्यांच्या स्वप्नाप्रमाणे चा उल्लेख आहे म्हणून मनात आले की आजचा भारत चाणक्यानी तरी कल्पिला होता कां/ की आपलाच तो कल्पनाविलास व चाणक्याच्या पदरी एक आयतं स्वप्न? असो.मला जे वाटते ते जरा स्पष्टच लिहतो.उपमर्द न समजावा.
'जर इंग्रज भारतात आले नसते तर ..... '
१ तलवारीच्या जोरावर(तेव्हा बंदुका/ विमाने/अणवस्त्रं नसल्याने म्हणा) राज्यं मिळत व टिकत. तशी ती चालू राहिली असती व भारत हा तेव्हा जसा विविध राज्यांचा(हिंदु व मुसल्मानी) मिळून होता तसा राहिला असता. एकचक्रानुवर्ती नसताही. तसा तो अशोकानंतर केव्हा होता?(आधारः शालेय इतिहास) जर एखादा एकचक्रानुवर्ती झाला असता तर आजची स्थिती नसती. तो हिंदु असता हा ही एक कल्पनाविलास व तो जर ताणला तर....आनंदीआनंद !
२ की भारत एक प्रगत राष्ट्र असते ?
नक्कीच ! असे वाटते की, भारत एकसंघ असता या गृहितकावर आहे. आजची पिढी ही कशी असती यावर ते ठरले असते. इंग्रजवजा भारतातहीआधुनिकता/पुरोगामित्व आलंच असतं. व्यापार व परदेशगमन तेव्हाही होतंच. बंदीमुळे ते खूप कमी होते. तरी समुद्रबंदी म्ह्णून खुष्कीच्या (?) मार्गाने व म्हणून ते दुष्कर पण अशक्य नव्हे. त्यामुळे मला असे वाटते की ज्ञानाचे दळणवळण ही झाले असतेच.
उत्तर भारतात चीनी/जपानी/आशियाई प्रवासी व व्यापारी येत जात असत. असो.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन विचार मांडले .