छान लेख.
===
मी सदर विषयाचा अभ्यासक नसलो तरी एक पुरवणी जोडावीशी वाटते. नुकताच अमेरिकेतल्या आकाशवाणीवर एक कार्यक्रम ऐकण्यात आला. त्यात माझ्या काय लक्षात राहिले ते सोप्या भाषेत मांडत आहे.
या कार्यक्रमात वॉशिंग्टन विद्यापीठातल्या पट्रिशिया कह्ल (नाविक हाल झाले असल्यास क्षमस्व) यांनी एमईजी (magnetoencephalogram) वापरून १ ते १२ महिने वयांच्या बाळांच्या मेंदूंचा अभ्यास केला.
या बाळांना अनेक आवाज ऐकवण्यात आले. यातले काही आवाज यंत्रांचे होते तर काही आवाज माणसांचे. हे प्रयोग करताना त्यांनी बाळांच्या मेंदूची निरीक्षणे केली. मुख्यतः ध्वनी ग्रहण करणारे केंद्र आणि ध्वनी निर्माण करणारे केंद्र, आणि या दोहोंत कसा आणि कधी संवाद साधला जातो ते पाहिले.
त्यांतून खालील निष्कर्ष काढता येतील असे त्यांचे मत आहे-
१. साधारण महिनाभर वयाची बाळे फक्त आवाजाची नोंद करतात. ध्वनीनिर्माण केंद्र संपूर्णतः झोपलेले असते.
२. थोडी मोठी बाळे यंत्रनिर्मित आवाज आणि माणसाच्या आवाजात फरक करू शकली. ते ओळखले कसे? तर जेंव्हा यंत्राचा आवाज ऐकला तेंव्हा ध्वनीनिर्माण केंद्रात काही हालचाल* दिसली नाही, माणसाचा आवाज ऐकला तेंव्हा तिथे हालचाल* दिसली.
३. आणखी थोड्या मोठ्या बाळांच्या ध्वनीनिर्माण केंद्रात माणसाचा आवाज ऐकल्यावर खूपच हालचाल* दिसली. आणि तो आवाज काढायचा प्रयत्न करू लागली.
४. साधारण १२ महिन्याची बाळे प्रत्यक्षात काही शब्द उच्चारू लागली होती.
*अधिक योग्य शब्द न सुचल्याने हालचाल हा शब्द ऍक्टिविटि या अर्थाने वापरला आहे.