मलाही भाषक हा शब्द खटकत असे. मात्र थोडा विचार केल्यावर भाषक हा शब्द बरोबर आहे हे लक्षात आले. ते कसे बघा - माईक ला आपण ध्वनिक्षेपक म्हणतो. म्हणजे (ध्वनीचे) क्षेपण करणारा तो क्षेपक (क्षेपिक नव्हे), गायन करणारा तो गायक (गायिक नव्हे), नर्तन करणारा तो नर्तक (नर्तिक नव्हे), तसेच भाषा बोलणारा तो भाषक (भाषिक नव्हे).

मात्र संबंधी अशा अर्थाने इक् प्रत्यय लागल्यावर भाषिक असा अर्थ होतो. भाषिक चा अर्थ भाषेसंबंधी. भाषा संदर्भात पडलेल्या प्रश्नांना मी भाषिक प्रश्न असे म्हणते. मराठी भाषिक म्हणजे मराठी भाषेसंबंधी/संदर्भात, तर मराठी भाषक म्हणजे मराठी बोलणारा.