चिमण, ए, मस्तच झालंय हं तुझं लिखाण.  रांगोळीशी खरंच एक वेगळाच जिव्हाळा आहे.....अजूनही.  तुझ्यामुळे सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.  मी पण तासन तास घालवले आहे ठिपक्याच्या रांगोळीसाठी. अजूनही मुक्त हस्त नक्षीपेक्षाही मला ठिपक्यांचीच रांगोळी जास्त आवडते.

रोहिणीनी सांगितल्याप्रमाणे लग्नात ताटाभोवती रांगोळ्या घालतानाची धमाल आठवली.  आता मात्र मी बरेचदा फ़ुलांच्या रांगोळ्या घालते..... किंवा रांगोळी, पानं, फ़ुलं, चमकीची पावडर...... असं सगळं मिळून.

इथे कुवेतला रांगोळी नसली की खोबऱ्याचा किस वापरतात.  त्यात वेगवेगळे रंग मिसळून रांगोळी काढतो आम्ही....... खोबऱ्याचा कीस थोडा जाड असल्यामुळे रांगोळी अगदी गालीच्यासारखी दिसते.