कथाकार गजाननराव,

कथा अप्रतिम आहे! अत्यंत ओघवती भाषा हे आपले वैशिष्ट्य आहे. त्या ओघवतेपणातच कथेचे पहिले वाचन होते. शेवट इतका धक्कादायक निघाला की कथा पुन्हा वाचून काढावी लागली. एक एक वाक्य उलगडत गेले.

आपल्या एका कथेतून कमीत कमी दोन कथा तर वाचायला मिळतात असे वाटते.

प्रामाणिकपणे सांगायचे तर ही कथा आणखी काही वेळा (आणि कालांतराने पुन्हा पुन्हा) वाचली तर अधिकाधिक अर्थ लागत जाईल असे वाटते. आपण बराच विचार करून अत्यंत हुशारीने कथा लिहिता असे वाटते.

आपल्या लेखनकौशल्याला आमचा प्रणाम.

आपला
(वाचक) प्रवासी