कवितेचा आशय बाजूला राहून विषयांतरच फार होतं.
सर्वसाधारण भारतीय सर्वसाधारणपणे ऐतिहासिकतः (historically) गोरेपणा आणि सुंदरता यांत गफलत करताना दिसतात. येथे प्रतिसाद देणारे त्याला योग्य (rightfully) विरोध करताना दिसतात ... पण खूपच बाऊ करतानाही दिसतात.
कवीने ती तुलना केवळ एक दाखला म्हणून असे समजून सोडून द्यायला काय हरकत आहे? मला व्यक्तिशः असे वाटते की तुषाररावांनी जरी कांदे आणि बटाट्यांची तुलना केली असती तर त्यालाही आक्षेप घेणारे निघतील ... आणि ते स्वाभाविकच आहे ... कवितेच्या मूळ विचाराला असे प्रतिसाद अधिकच पुष्टी देतात असे नाही वाटत?
दुसरे असे की, कुणी सांगावे, आपल्यातल्या (भारतीय) काहींना काळे कुरुप वाटतात तसे त्यांना (आपल्यामते) नाकीडोळे नीटस असणारे भारतीय अतिशय कुरुप वाटत असावेत. असो.
- मोहन