सुप्रिया,
सुंदर कविता ! आशयघनता इतकी प्रभावी की ' अंगाभोवती पुरणारी याच्या कुणाचीही चादर नाही ' ही ओळ मनांत घर करून राहते.
कविता जवळ जवळ गझलच्या अंगाने गेली आहे. पण........ (माफ कर हं ! मी मागच्या जन्मी कावळा असेन बहुदा ) ' गा गा ल गा ल गा गा ' चा छंद पाळता आला सुंदर गझल लिहू शकशील.
थोडी मोडतोड करू ? ........
आता इथें कुणाला, कुणाचीहि कदर नाही
माणूस नांव आहे, माणसांची कणव नाही
तू गझल छान लिहिशील. मराठी गझल गुरु सुरेश भटांना ओळखतेस ना ?
शुभेच्छा !
अरुण वडुलेकर