इंग्रजी मधे v आणि w यांच्या "व" उच्चारात फरक आहे. v चा उच्चार करताना ह् चा उच्चार जाणवतो.
What, Why सारखे शब्द तसे ही w आणि h पासून बनले तरी यांचा उच्चार ह् व् असा होतो असे वाचले आहे. वॉट, वेरी, वाय असे उच्चार पटत नाहीत.
v आणि w यांच्यातली 'व' वेगळे आहेत. मात्र very किंवा voracious या शब्दांच्या 'ह्' जाणवत असला तरी हा उच्चार अगदीच हलका आहे. त्यामुळे लिहिताना गाळलेला बरा असे मला वाटते.
याउलट, sleeve ह्या शब्दाचा उच्चार स्लीव्ह (किंवा स्टीईह्व) असा होतो. त्यात 'व्ह' (की ह्व?) अगदी स्पष्ट आहे.
पण ह्या आणि अश्या उच्चारांसाठी नवीन चिन्हे हवीत असेही वाटते.
चित्तरंजन