भूमातेस-(शार्दूलविक्रिडित)

होते जो बळ तो परासि लुटणे मी मानिले पाप ते

जाता मद् बळ हाय मजला ते पुण्यचि शापते

याचा अर्थ लावताना लक्षात आले की, गुण हा दुर्गुण कसा ठरतो पहा. जोवर ताकदवान/सक्षम आहे तोवर तो गुण व त्याची वाहवा परिस्थितीवश तोअंगी नसता तर .. असा(बरं झालं असतं) विचार दिसतो.

त्राता देव नृसिंह सोडुनी पुजूं गाईसची जाय मी

वाघाच्या पुढती म्हणुनी बनले गायीहुनी गाय मी

हा विचार अचूक मीमांसा करतो की,शक्तिपूजा न करता जर अन्य भाकड गोष्टी(गोपूजा न मानणे हा गाभा ) अंगी भिनल्याने   सशक्त शत्रूसमोर गाळण उडते आहे.

मी दे दूध जयासि घे उलटुनि तो सर्पची दंश हा

ज्या दुष्ट शक्तिस बळ मीच (स्वदेशवासी दयाळु) पोसले /वाढवले ही जाणीव यशस्वितेने करुन दिली आहे.

धन्य ते सावरकर