नैसर्गिक सीमा (मुख्यतः नद्या, पर्वतरांगा) सांभाळून प्रांतरचना व्हायला हवी होती असे वाटते.

तसेच, जुन्या-मोठ्या-ऐतिहासिक शहरांना राजधान्या बनवायच्या ऐवजी प्रांताच्या बरोबर मध्ये असलेल्या शहरांना राजधान्यांचा दर्जा द्यायला हवा होता असे वाटते. असे गाव/शहर तिथे नसेल तर ते वसावावयास हवे होते असे वाटते. हे राज्य आणि देश दोन्ही पातळ्यांवर व्हायला हवे होते असे वाटते.

राज्यांची/देशाची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानी एकच ठेवण्याचे काही कारण नव्हते असे वाटते. असे केल्याने उद्योगांचे, लोकसंख्येचे, संपत्तीचे विकेंद्रिकरण होण्यास मदत झाली असती असे वाटते.

जुन्या, बेबंद आणि वाकड्यातिकड्या वाढलेल्या शहरांना राजधान्या केल्याने ही शहरे आणखी फुगली आणि आता अतिशय आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय या शहरांचे रूपांतर होणे अवघड दिसते आहे.