गणेशरावांचे वर्णन ऐकुन अगांवर शहारेच आले. आज नाही तर उद्या या समस्येला हात लावावाच लागेल. एकीकडे अन्नान्न दशा तर दुसरीकडे अन्नाचा नाश करण्याची विचित्र वृत्ती. या कथेतुन अशा समस्यांना समाधान शोधण्याची सुबुध्दी लाभो.
मी स्वःत नागपूर मध्ये असे दृष्य पाहिले होते. एक भिकारीण एका गटारीजवळ ( गटार अंदाजे ५/६ हात खोल असेल) बसली होती. जवळ तिचे लहान मुल ५/६ महिन्याचे खेळत होते. गटारीच्या कड्यावर ते बरेच वेळेस येत होते, परन्तु ती बाई ते मुल गटारीत पडेल काय? याचा विचार न करता घुम्मपणे बसली होती. २/३ दिवस ते दृष्य माझ्या नजरेसमोर तरळत होते.