"त्याकाळात रूढ असणारी बहुपत्नीत्वाची पद्धत आणि त्यामुळे थोरली महाराणी या नात्याने करावि लागणारी तडजोड, धाकट्या राण्यांना मार्गदर्शन, पतीची विभागणी हे सारे करतांना सात्विक स्वभावाच्या रुख्मिणीची होणारी घालमेल "

सोनाली,

अहो त्यावेळी ही रुढ अशीच पध्दतच होती. अर्जुन, कृष्ण, भीम, कर्ण, यासर्वांचे बहुपत्नीत्व सर्वांनीच मान्य ( म्हणजे त्यांच्या बायकांनीच) केले होते.
तुम्ही रुख्मिणीच्या भुमिकेत बरेच तद्रुप झाल्यामुळे तुम्हाला हे थोडे वावगे वाटले असावे. पण ही तुमच्या मनाच्या तरळतेची खुण आहे असे मला वाटते.
दारुकाचे वर्णन पण आवडले. कृष्ण सारथी झाल्यानंतर अजुन काही स्पष्टिकरण मिळेल असे वाटते.
असेच लिहित रहा...

द्वारकानाथ.