आम्ही डाव्या हाताच्या ओंजळीत रांगोळी घेऊन उज्यव्या हाताच्या चिमटीमध्ये रांगोळी घेऊन काढायचो. त्यासाठी ठिपके काढण्याचा सराव पाटीवर करायचो. पाटीवर सरळ रेषेत ठिपके काढून रांगोळी काढायचो. नंतर अंगणात खडूने सरळ रेषेत ठिपके काढून मग त्यावर रांगोळीने ठिपके काढायचो. नंतर सरावाने ३० ठिपके आडवे व उभे असे सरळ रेषेत व बारीक यायला लागले. अगदी सरळ रेष येण्याकरता थोडा वेळ श्वास रोखायला लागतो. चिमटीत रांगोळी घेऊन काढली की हात दुखायला लागतो. सरावासाठी आधी खडूने ठिपके व नंतर ते खडूनेच जोडायचे व नंतर त्यावर चिमटीत धरून रांगोळी घालायची. अशाने नजर पक्की होते व हातालाही एक प्रकारचे वळण लागते. पीठीसारखी रांगोळी सर्वात चांगली.