माझ्या माहिती नुसार (हिंदू) महिन्याचे नाव चंद्र पौर्णिमेला कोणत्या नक्षत्रात आहे त्यावरून ठरते.
हे बरोबरच आहे, चित्रा वरून चैत्र, विशाखा वरून वैशाख इ.बारा नांवे त्या त्या नक्षत्रानुसार दिली गेली आहेत. पण इतर पंधरा नक्षत्रांचे काय? ती सुद्धा पौर्णिमेला चंद्राजवळ येतात. हा एक प्रश्न माझ्या मनात यायचा. दुसरी गोष्ट अशी की पौर्णिमा दिवसभर असते. त्या काळात नेमके कोणच्या वेळेतील नक्षत्र धरायचे?
"आणि त्या वेळी सूर्य कोणत्या राशीमध्ये असेल त्य़ावरून त्या महिन्याचे नांव ठरते." ही माहिती मला अवकाशवेध वर मिळाली व पटली. चंद्राने सूर्याच्या मागून पुढे जाणे हा एक विशिष्ट क्षण आहे. त्या क्षणी अमावास्या संपून पुढील महिना सुरू होतो. त्या क्षणी सूर्य कोणच्या राशीमध्ये आहे हे नेमके माहीत असते व त्यावरून महिना ठरवता येतो. नांव चंद्राजवळील नक्षत्राचे असले तरी ते सूर्य ठरवतो अशी गंमत आहे.
प्रतिसादाबद्दल आभार.