मतकरींच्या कथेंमधे अधिक वैविध्य आढळते. दुर्दैवाने मला हल्ली नावांसकट आठवत नाहीत. पण गहिरे पाणी, खेकडा, रंगांधळा, बारा-पस्तिस, कबंध असे अनेक कथासंग्रह वाचले आहेत.
भितीला हा माणूस सहज सुंदर शैलीत एक वेगळच स्वरुप देतो. त्यांच्या गोष्टीतली सजीव-निर्जीव कुठलीही गोष्ट भिती निर्माण करते. उदा, काही कल्पना पहा,
१. मृत्युनंतर बायकोचे फक्त हात नवऱ्याला भेटायला येणे.
२. सुनिताला शाळेच्या रस्त्यावर अचानक सगळे विचित्र भासू लागणे आणि शाळेत पोहचल्यावर स्वतःच्या मृत्युची बातमी देणारा फळा दिसणे.
३. घर या गोष्टीतले घर सजीव होऊन घरमालकावर अधिकार गाजवू पाहणे.
४. केवळ असामान्य भुकेपोटी स्वतःच पिशाच्चांचे भक्ष्य होऊन जाणे.
प्रत्येक गोष्टीत ज्ञात-अज्ञाताची हा माणूस सुरेख सांगड घालतो. कथेचा शेवट सुखद असावा असा हट्ट नाही. सगळ्या कथा सर्वसामान्य ठिकाणी घडून येतात आणि न चुकता काहीतरी असामान्य घडवतात.
धारप तर आवडतातच. पण भितीतलं वैविध्य वाचावं तर मतकरींच.
रावसाहेब, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. फक्त प्रयत्न करून पाहते आहे.