जातिव्यवस्था हे हिंदू धर्माचे एकमेव लक्षण आहे काय? बाकी कोणती लक्षणेच अस्तित्वात नाहीत काय?
एकमेव नाही परंतु जन्मावर आधारीत जातिव्यवस्थेची उतरंड हे हिंदू धर्माचे एक प्रमुख लक्षण आहे हे निश्चित.
सहिष्णूची व्याख्या काय? त्या व्याख्येच्या जवळ जाणारा कोणता धर्म अस्तित्वात आहे?
शरदरावांनी सुरू केलेली चर्चा ही हिंदू धर्म तुम्हाला का आवडतो त्या विषयी आहे. तेव्हा इतर धर्माशी तुलना वगैरे गोष्टी येथे अप्रस्तुत ठरतात. (बौद्ध धर्म हा अधिक सहिष्णू आहे, हे माझे वैयक्तिक मत. असो, विषयांतर येथेच थांबवू)
वाईटाला वाईटच म्हणावे, पण चांगल्याला चांगले म्हणताना जीभ (आणि बोटे) जड पडू नयेत असे वाटते.
मी नावदेवरावांना दिलेल्या खुलाशात म्हटल्याप्रमाणे, माझी प्रतिक्रिया ही शरदरावांनी मांडलेल्या दोन कारणांपुरतीच मर्यादित आहे. बाकी हिंदू धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत हे मी नाकारत नाही.