"महिना खरे तर पृथ्वी सूर्याभोवती कोठे आहे यावरून अधिक ठरतो असे म्हणता येईल" हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.  परंतु आपण पृथ्वीवर रहात असल्यामुळे आपल्याला सूर्य वेगवेगळ्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आकाशात भ्रमण करतो आहे असे वाटते. खरं तर सूर्य आकाशात असतांना तारे दिसतच नाहीत. पण सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर दिसणारे तारे पाहून सूर्य कोणत्या नक्षत्रांत किंवा राशीमध्ये आहे हे ठरवू शकतो.

नक्षत्रे व राशी ज्या तारकापुंजावरून ओळखली जातात ते आपल्यापासून खूप खूप दूर आहेत व कोणताही ग्रह प्रत्यक्षांत त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही ही वस्तुस्थिती आपण बुद्धीच्या जोरावर समजून घेऊ शकतो परंतु सर्वसामान्य माणूस चंद्र, गुरु, शनि वगैरेंना त्यांच्या पार्श्वभूमीवर पाहून ते त्या राशीत गेले आहेत असे समजतो व तसे म्हणण्याची पद्धत पडली आहे. खरं तर मकरसंक्रांतीचे दिवशी सुद्धा सूर्य आपले जागेवरच असतो व पृथ्वी फिरत असते पण आपण सूर्याने मकर राशीत प्रवेश केला असे म्हणतो.

प्रतिक्रियेबद्दल आभार