मी चूक करीत नसल्यास ही सीमा रॅडक्लीफ़ या अधिकाऱ्याने ठरवली. मुळात कुठला भाग द्यायचा हा काही नवा प्रश्न नव्हता.
आपली माहिती खरी आहे. ह्या सर सिरिल रॅडक्लिफ़ महाशयांनी भारतात पाऊलदेखील न ठेवता फाळणीची आखणी केली. आणखी एक गोष्ट, १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत फाळणीच्या सीमा निश्चित झालेल्या नव्हत्या. त्या झाल्या काही दिवसांनंतर !
पुढे जाऊन पूर्व बंगाल मध्ये मुस्लिम लीगचा जोर वाढला
मुस्लिम लीगचा जन्मच मुळात ढाक्याचा ! तेथे त्यांचा जोर होताच. शिवाय लॉर्ड कर्झनने आखलेली पण नंतर टळलेली बंगालची फाळणी करायची होतीच.