गर्भावस्थेत असल्यापासूनच बाळाला आईचा आवाज परिचित असतो असे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे.

ही माहिती नवीन आहे.

बाळाचे मन हे एक कोरी पाटी असते आणि आपल्या पालकांचे विविध उच्चार ऐकून मूल भाषा शिकते असा जुना समज बराच काळ होता.

माझा अजूनही असाच समज आहे! बाळाशी खूप बोलत रहावे म्हणजे ते नवनवीन शब्द शिकते असे आम्हाला सांगितले होते. मला ते पटलेही होते. शिवाय ऐकू न येणाऱ्या मुलांना बोलता येत नाही याचे काय स्पष्टीकरण ह्या नव्या थिअरीने देता येईल?

असो. लेख अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहे.