छान लिहिलं आहेस. अनेकदा वाईट वाटते की समाज अनेकदा एकाच वयाच्या स्त्री पुरुषाचं नातं पती पत्नी वा भाऊ बहीण या पलीकडे जाऊन पाहत नाही. कदाचित समाजाला निर्मळ नात्यांपेक्षा वासनेची भीती वाटते. पण अशी हि नाती आहेत या वर माझा तरी गाढ विश्वास आहे. लग्ना नंतर हेच नात पती पत्नी मध्ये असणं हे एक देवाच वरदान आहे आणि सत्यात त्या नात्याची गरज सुद्धा आहे.

त्या क्षणी मन मोकळ करायला सखा हवा हे खरं. मला सुद्धा त्या युगंधरा बद्दल आज सुद्धा ओढ आहे. आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाच योग्य उत्तर त्याच्याकडे आहे. त्याच कर्णा बरोबरच नात पण असच आहे.

या सख्याच्या नात्यात एकच धागा असतो विश्वासाच.