प्रवासी,मंदार,आनंद,मृदुला,सुभाषचंद्र,आशुतोष,सोनाली,वेदू, प्रसाद,भास्कर, प्रभाकर, व्यक्तीगत निरोपातून अभिप्राय कळवणारे मनोगती,
चं.गों. च्या 'मी माझा' च्या च्या चारोळ्यांचा सांगाडा ढापून त्यात माझे शब्द टाकून केलेल्या हा खाद्यप्रयत्नाला आपण भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
खारोळ्यांचा जन्म अर्थातच खाद्यप्रेमातून झाला आहे. आपल्याला जाणवत पण नाही, पण आपल्या बर्याच आठवणी खाद्याशी निगडीत असतात. "तेव्हा नाही का, आपण हॉटेलात गेलो होतो आणि छोले मागवायचे का आलूमटर यावरुन आपलं भांडण झालं होतं.." किंवा "आठवतं का तुला, आपण स्टेशनवर पाव सँपल खात होतो आणि गाडी चुकली होती.." इ.इ. म्हणून खाद्याला चारोळ्यारुपी सन्मान देण्याचा हा एक चुकत माकत प्रयत्न. मनोगतीना आवडल्यास 'खारोळ्या' या नावाखाली येऊ द्या आणखी खाद्यचारोळ्या मनोगतावरील कवींकडून!
आपली(खाद्यप्रेमी) अनु