पुण्यातीलही नाही आणि पाटीही नाही-
ठाणे येथे एका ठिकाणी बाइक पार्क केल्यावर मिळालेल्या पावतीवरचा मजकूर. पावतीवर रु. १/- लिहिले होतं आणि त्याने माझ्याकडून दोन रुपये मागितले. नंतर पावती व्यवस्थित वाचल्यावर त्यावर लिहिलं होतं-
रु. १/- एका चाकाचे.
यातील "एका चाकाचे" हा मजकूर इतक्या बारीक अक्षरांत लिहिला होता की सहजी वाचताच येऊ नये.