एकमेव नाही परंतु जन्मावर आधारीत जातिव्यवस्थेची उतरंड हे हिंदू धर्माचे एक प्रमुख लक्षण आहे हे निश्चित.
जगातला कोणताही देश/समाज सांगावा जिथे 'डिविजन ऑफ लेबर' नाही! जन्माधिष्ठित जातिव्यवस्थेचे 'ऱ्हेटॉरीक'च लावायचे असेल, तर तुमचे चालूद्या. (बाकी, जन्माधिष्ठित आरक्षणाची सवलत घेण्यासही आपला विरोध असावा असे मी समजतो.)
शरदरावांनी सुरू केलेली चर्चा ही हिंदू धर्म तुम्हाला का आवडतो त्या विषयी आहे. तेव्हा इतर धर्माशी तुलना वगैरे गोष्टी येथे अप्रस्तुत ठरतात.
"सहिष्णूची व्याख्या काय?" या प्रश्नाला तुम्ही सोयीस्करपणे बगल दिली आहे असे दिसते.
(बौद्ध धर्म हा अधिक सहिष्णू आहे, हे माझे वैयक्तिक मत. असो, विषयांतर येथेच थांबवू)
तुम्हाला अतीसहिष्णू म्हणायचे आहे का?
बौद्ध धर्मीयांनी कितीही ओरडून सांगितले तरी तो वेगळा धर्म होत नाही असे वाटते. त्यांचे एकही तत्त्व असे नाही जे हिंदू धर्मात सांगण्यात आलेले नाही, असे वाटते. ऍज आइ सी इट, बौद्ध (अँड फॉर दॅट मॅटर, जैन टू) इज अ सबसेट ऑफ हिंदू प्रिन्सिपल्स! त्यामुळे बौद्ध हा पंथ ठरतो, धर्म नाही, असे वाटते.
मी नावदेवरावांना दिलेल्या खुलाशात म्हटल्याप्रमाणे, माझी प्रतिक्रिया ही शरदरावांनी मांडलेल्या दोन कारणांपुरतीच मर्यादित आहे. बाकी हिंदू धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत हे मी नाकारत नाही.
आपण आपल्या एकाच प्रतिसादात दोन वेळा या चर्चेचे उद्दिष्ट सांगायचा प्रयत्न केला आहे. पण तुमचे प्रतिसादांचा सूर "का आवडतो" याची कारणे देण्यापेक्षा "का आवडत नाही" याच भोवती रुंजी घालताना दिसतो. ही तुमच्या प्रतिसादांतली विसंगती आहे.