एखादा लेख किंवा प्रतिक्रिया लिहिल्यानंतर त्या लेखाला/प्रतिसादाला कोणी उत्तर/प्रतिसाद देईपर्यंत तो बदलू शकण्याची मुभा मनोगतावर आधी होती. पण ती आता नाही आहे. ह्याबद्दल प्रशासकच काय ते सांगू शकतील.

बाकी, प्रतिसाद/लेखाला जर कुणी उत्तर देत नसेल तर तो काढून टाकण्याची मुभा लिहिणाऱ्याला मिळावी असे मला वाटते.
परंतु जर कोणी उत्तर दिले असेल तर तो मूळ लेख काढणे चुकीचे(?) होईल असे वाटते.
अपवादः एखाद्याने त्या लेखाला/प्रतिसादाला आक्षेप घेताना जर त्यालाच प्रतिसाद लिहिला. :)