धन्यवाद दिवाशेठ हा अभ्यासपूर्वक दुवा दिल्याबद्दल. फाळणी (आणि काश्मीरबद्दल) काहींचे असलेले काही गैरसमज दूर होऊ शकतील !

आणि एक मुद्दा त्या दुव्यातील माहितीत नाही तो म्हणजे - नेहरूंचे काश्मीरखोऱ्याशी असलेले भावनिक नाते. त्यामुळे, येनकेन प्रकारे काश्मीरखोरे भारतातच ठेवायचे म्हणून त्यांनी अनेक लटपटी केल्या. जसे - जम्मू-काश्मीरच्या महाराजांना त्यांचा मुख्यमंत्री बदलावयास लावला. रॅडक्लिफ़ यांच्यावर लॉर्ड माउंटबॅटनचे दडपण आणून मुस्लिमबहुल गुरुदासपूर जिल्हा भारतातच ठेवला (हे दुव्यात आहे) आणि सर्वात कडी म्हणजे महाराजांनी केलेला "तथाकथित" सामीलनामा !! (तथाकथित, कारण त्याची मूळ प्रत आज कुठेही उपलब्द्ध नाही!).