जगातला कोणताही देश/समाज सांगावा जिथे 'डिविजन ऑफ लेबर' नाही

जगातला कोणताही धर्म (हिंदू सोडून) सांगावा ज्याने ह्या तथाकथित "डिविजन ऑफ लेबर" ला आपल्या धर्मग्रंथातून स्थान देऊन "प्रतिष्ठित" आणि "कायदेशीर" केले ?

जन्माधिष्ठित आरक्षणाची सवलत घेण्यासही आपला विरोध असावा असे मी समजतो

साफ चूक. किंबहुना म्हणूनच माझा त्याला पाठिंबा आहे. (पाहा वरील उत्तर).

पण तुमचे प्रतिसादांचा सूर "का आवडतो" याची कारणे देण्यापेक्षा "का आवडत नाही" याच भोवती रुंजी घालताना दिसतो. ही तुमच्या प्रतिसादांतली विसंगती आहे.

का आवडतो यातच का आवडत नाही हे अंतर्भूत आहे. सगळेच जण का आवडतो ते सांगू लागले तर त्यात चर्चा ती कसली ? म्हणूनच यात विसंगती किंवा विषयांतर नाही. बौद्ध हा धर्म आहे की पंथ आणि तो सहिष्णू आहे का ही चर्चा मात्र निश्चितपणे विषयांतर !!