उत्तरे

१. ही नावे संशोधकच ठरवतात असे नाही. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनमिकल सोसायटीच्या स्मॉल बॉडी नॉमेन्क्लेचर विभागातर्फे काही नावे निश्चित झाली आहेत. वरूण हे नाव ह्याच संस्थेने निश्चित केले. पालोमार वेधशाळेमध्ये आर. एस. मॅकमिलन आणि जे. ए. लार्सन ह्या दोघांनी वरूणाचे सर्वप्रथम निरीक्षण केले. वरूणाच्या शोधाचा अधिकृत दिवस २८ नोव्हेंबर २००० मानला जातो. वरूण हे नाव एम. साराभाई ह्यांनी सुचवले अशी माहिती मिळाली. 

वरूणाच्या शोधाबद्दलची अधिक माहिती इथे आणि इथे मिळेल.

ग्रहांची नावे कशी व कोण ठरवते ह्याबद्दल मला पुरेशी माहिती नाही. पुरेशी माहिती मिळवून सविस्तर उत्तर देईन.

२. प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदते व प्लुटोच्या कक्षेचा थोडा भाग नेपच्यूनच्या कक्षेच्या आत आहे. त्यामुळे प्लुटो कक्षेच्या ह्या भागात असताना त्याचे सूर्यापासूनचे अंतर नेपच्यूनच्या सूर्यापासूनच्या अंतरापेक्षा कमी असते व म्हणून तो त्यावेळी आठव्या स्थानावर असतो. कृपया खालील आकृती पाहा -