बुध ते युरेनस ह्या ग्रहांची प्रत्यक्ष अंतरे टायटस-बोड नियम सांगतो त्या अंतरांशी खूपच जुळतात. नेपच्यूनचे प्रत्यक्ष अंतर टा-बो अंतराशी बरेचसे जुळते. मात्र प्लुटोचे प्रत्यक्ष अंतर हे ह्या नियमानुसार अजिबातच नाही. अंतरातील तफावत खूपच आहे. त्यामुळे प्लुटोपलिकडील अवकाशातील वस्तूंची अंतरे ह्या नियमानुसार असण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे.