काय काय म्हणून सांगू...
- ज्ञानेश्वरांचे पसायदान
- शंकराचार्यांचे ततः किम्
- नचिकेताचा यमाशी संवाद
- रामरक्षा/अथर्वशीर्ष/सहस्त्रनाम यांतील सौंदर्य आणि गोडी
- विवेकानंदाची भाषणे/महाभारत/रामायण ... ...
- घराघरातील छोट्या देव्हाऱ्यांमध्ये एकमेकांशेजारी गुण्यागोविंदाने नांदणारे दत्त/गणपती/शंकराची पिंडी....
- बायबल हा पाचवा वेद आणि अल्ला हा आणखी एक देव हे ही स्वीकारताना न अवघडणारी मने
- "तू हिंदू आहेस असे ठसविण्याचा" आईवडीलांनी कधीच न केलेला प्रयत्न
- राक्षसांच्या मुंडक्यांची माळा गळ्यात लेवणारी दुर्गा
- वारकरी ही एकच जात ओळखणारी संतपरंपरा
- कीर्तने/भारुडे आणि कर्मयोग/ज्ञानयोग यांची चिकित्साही...
- हिंदूमध्ये चांगले काय ह्याचा विचार करताना जातीपातीच्या भूतकाळाबद्दलची लाज आणि चीड आगडोंबीसारखी सहजपणे उमटावी अशी घडलेली आमची मानसिकता
- पातशाहीचा आदर्श निम्राण करणारा हिंदू सिंहासनाधीश्वर शिवाजी राजा
- एकरेषीय नव्हे तर चक्रीय विचारधारा नसांनसांत भिनलेले तत्त्वज्ञान
- कोणत्याही चार पुस्तकांनी किंवा चार देवस्थळांनी व्याख्या न करता येणारी ही जीवनपद्धती
- ... ... ... ...
हे भावनिक लिखाण नाही... आणि चिकित्सकही नाही... पण येथे लिहिलेले आणि असेच बरेचसे -- सारे सारे -- काही मला आवडते.
जन्मजात ही संधी उपलब्ध झाली हे तर भाग्यच... तरीही हजारो वर्षे अनेकानेकांच्या प्रेमातून, श्रमातून घडलेल्या या प्रवाहात मी आनंदाने पोहत असतो... माझ्यासाठी तरी या साऱ्यांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत...