सत्वर प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !
कुणी नुसतेच "छान" असे म्हटले तर इथे लिहिलेले वाचले आणि आवडले जात आहे हे बघुन बरे वाटतेच, पण त्याही पुढे जाउन काही जण जेंव्हा यातले आपल्याला काय भावले, त्याबद्दल काय वाटले, काय बदलता आले असते असे लिहितात तेंव्हा त्याचा पुढच्या लेखन-विचार प्रवासात खूप उपयोग होतो. या ठिकाणी मिळणारा हा उस्फुर्त प्रतिसाद मला खूप आवडला.
एखादे प्रवासी, भास्कर वा दंतकर्मी जेंव्हा विस्ताराने लिहुन लेखकाला अभिप्रेत असलेले शब्दान्वय, अर्थछटा वा प्रतीकं अचूक हेरतात तेंव्हा जे जे म्हणायचे आहे ते ते पोहोचते आहे हा विश्वास मिळतो.
मन:पुर्वक धन्यवाद !
आपला ( गजानन वा गणेश नसलेला )
जीएस