लेखन आवडले. आमच्या घरी होणाऱ्या गोष्टींची आठवण झाली. गणपती आणायला मी फारशी कधी गेल्याचे आठवत नाही. शक्यतो बाबाच आणायचे. मात्र तोंडात पाणी धरून, गौरीचे खडे हातात घेऊन चालल्याचे आठवते आहे. मात्र हे पाणी घराबाहेरून घराच्या उंबरठ्यापर्यंत येईपर्यंतच. एकदा घरात प्रवेश केला की पाणी गिळण्याची मुभा असे. मग रांगोळीच्या पावलांवरून चालताना आईने प्रत्येक पाऊल टाकताना विचारलेल्या "गौरी, गौरी कशाने आलीस?" ह्या प्रश्नाला गौरीतर्फे "सोन्यारुप्याच्या पावलांनी आले", "हिऱ्यामाणकांच्या पावलांनी आले", "सुखसमृद्धीच्या पावलांनी आले" अशी उत्तरे देत असू, त्याची आठवण झाली.

अवांतर - अक्षता असा शब्द आहे, अक्षदा नव्हे.