शेवट वाचल्यावर कारकून, प्राची यांप्रमाणे प्रश्न पडला होता. मात्र विचार केल्यावर एक संभव वाटला. प्रियालीचे उत्तर आल्यावर मला वाटलेले बरोबर का? ते बघायचे होते. मात्र मला वाटलेले लेखिकेच्या मनांत नसले तरी ते सयुक्तिक उत्तर होऊ शकेल असे वाटल्याने माझ्यातर्फे हे स्पष्टीकरण - (प्रियाली, आगाऊपणा करत असल्याबद्दल क्षमस्व)
पिंटू विहिरीत पडून मेल्याला बरीच वर्षे झाली असावीत असे कथेवरून वाटते. पिंटूची आई म्हणजेच ह्या जन्मीची स्वाती. स्वाती ह्या घरात रहायला येण्यापूर्वी तेथे राहिलेल्या कुटुंबे ते घर सोडून गेली. पण त्या कुटुंबातील व्यक्तींचे पिंटूने खून पाडल्याचे दिसत नाहीत. वासूला का मारले? कारण स्वाती हीच त्याची पूर्वजन्मीची आई असल्यामुळे वासूने तिथून जाण्याबद्दल सुचवणे त्याला अगदीच असह्य झाले. (वासू हा पिंटूचा पूर्वजन्मीचा बाबा नसणार) आणि नंतर स्वातीने पिंटूला जवळ ओढण्याचे कारणही तीच त्याची पूर्वजन्मीची आई हेच.
(स्वतःला कथा लिहिता येत नसतील म्हणून काय झाले? दुसऱ्यांनी लिहिलेल्या कथेचे आगाऊपणे स्पष्टीकरण तर करता येते!!!! ः) म्हणजे खूप झाले की!!!!)