घराघरातील छोट्या देव्हाऱ्यांमध्ये एकमेकांशेजारी गुण्यागोविंदाने नांदणारे दत्त/गणपती/शंकराची पिंडी....
बायबल हा पाचवा वेद आणि अल्ला हा आणखी एक देव हे ही स्वीकारताना न अवघडणारी मने
"तू हिंदू आहेस असे ठसविण्याचा" आईवडीलांनी कधीच न केलेला प्रयत्न
-- सहमत. बुद्धाला दहावा अवतार ठरवण्यामागे, माउंट मेरीची मोतमावली होण्यामागे आणि मुस्लिम धर्मीय मियाँसाबांची सद्गुरु म्हणून देवघरात लावलेली तसबीर तळकोकणात (सावंतवाडी विशेषतः) घरोघरी दिसण्यामागे हीच सर्वसमावेशक वृत्ती आढळून येते.