बुद्धाला दहावा अवतार ठरवण्यामागे, माउंट मेरीची मोतमावली होण्यामागे आणि मुस्लिम धर्मीय मियाँसाबांची सद्गुरु म्हणून देवघरात लावलेली तसबीर तळकोकणात (सावंतवाडी विशेषतः) घरोघरी दिसण्यामागे हीच सर्वसमावेशक वृत्ती आढळून येते.

...की 'देखल्या देवा दंडवत'?????? खुद्द मुसलमान मियाँसाहेबांना अल्लाच्या बरोबरीचे मानत नसावेत! (किंबहुना कोणालाही अल्लाच्या बरोबरीचे मानणे हे इस्लाममध्ये देहदंडास पात्र महत्पाप आहे, असे काहीसे ऐकून आहे.)

अवांतर: बाकी कशावरूनही स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात हिंदूंचा हात धरणारे कोणी नसावे. 'काशीविश्वेशवराच्याच (तपशिलाची [घोड]चूभूद्याघ्या!) मंदिरास चिकटून (की अर्ध्या भागात? नक्की आठवत नाही.) मशीद आहे, हे हिंदूंच्या सहिष्णुतेचे लक्षण आहे', असेही फारा वर्षांपूर्वी 'दूरदर्शन'वर एका 'सरकारी' कार्यक्रमात ऐकल्याचे स्मरते! (त्याकाळी 'दूरदर्शन'ला पर्याय नव्हता; इतकी जुनी गोष्ट आहे. नक्की आठवत नाही, पण तेव्हा बहुधा विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान होते. त्यांचा या गोष्टीशी संबंध नाही; केवळ कालमानाचा अंदाज यावा म्हणून सांगितले.)

- टग्या.