जयंतराव,
कवितेतली तळमळ मनाला भिडली. विदेशी कंपन्या मुलांवर कोणतीही जबरदस्ती करत नाहीत, तरीही आज कोपऱ्याकोपऱ्यावर किराणा दुकानात 'रुह अफजा' आणि जलजिरा मिळाले नाही तरी शीतकपाटात या काळ्या पेयांच्या मुबलक बाटल्या रात्रंदिवस असतात. मॅक्डी आणि पिझ्झ्याच्या झोपड्यांमध्ये आकर्षक सवलतीच्या दरात पाण्याऐवजी पाजली जातात. प्रत्येक यशस्वी  सिनेकलावंताकडून मुबलक पैसे देऊन आकर्षक नाच आणि कपडे असलेल्या आणि दीर्घकाळ लक्षात राहणाऱ्या जाहिराती केल्या जातात..
मुलं आणि मोठी या काळ्या बाटल्यांकडे जास्त आकर्षित होतात. पण विचाराचा मुद्दा असा की यांच्याऐवजी चांगले पर्याय म्हणून आपण (म्हणजे भारतीय उद्योजक) त्याच सुलभ आणि आकर्षक मार्केटींगने आणि पॅकींगमधून पन्हे, ताक, गुलाब सरबत, जलजिरा, लिंबूपाणी(खरेखुरे),लस्सी,आवळा सरबत,वाळा सरबत आदींचे 'ऍग्रेसिव्ह मार्केटिंग' का करु शकत नाही?(आताही ही पेये लोकप्रिय आहेत, पण त्यांना जोरदार जाहिरातींची आणि पैशाची साथ नाही.)
(आज अचानक फेरी मारत असता ही कविता नजरेस पडली आणि त्याखालचे 'लिंबूपाणी' विषयांतरही.)