माहितीसाठी धन्यवाद.
मी वर्षातून एकदा ऐच्छिक रक्तदान करतो. तसे दर ३ महिन्यातून करता येते. पण सर्व निरोगी धडधाकट नागरिकांनी वर्षातून किमान एकदातरी रक्तदान केल्यास ऐनवेळी रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही.
भारतात अंधांची संख्या प्रचंड आहे. सुमारे १ कोटीहून अधिक (जगात सर्वाधिक) यातील किमान ४० लाखांना नेत्ररोपणामुळे दृष्टी मिळू शकते. एक व्यक्ती (मरणोत्तर ) नेत्रदान करून २ अंधांना दृष्टी देऊ शकते. `मरावे परी नेत्र रूपे उरावे' असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही. एक छोटासा ५ कोटींचा श्रीलंका हा देश भारताला नेत्र पुरवतो पण १ अब्ज लोकसंख्या असलेला , संस्कृतीच्या गप्पा मारणारा आणि दानाचे पौराणिक संदर्भ देणारा आपला देश स्वबळावर येथील अंधांना दृष्टीदान देऊ शकत नाही ही खेदाची बाब नव्हे काय?
आपला देश भगवदगीतेचा अभिमानाने उल्लेख करतो. आत्मा शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो इत्यादि तत्वज्ञान सांगितले जाते. लोक ते सर्व ऐकून धन्य होतात. पण प्रत्यक्षात किती जण त्यानुसार वागतात? आत्म्याचे अमरत्व इत्यादि वादग्रस्त मुद्दे आहेत. पण नश्वर शरीराचा मृत्युनंतर इतरांच्या भल्यासाठी उपयोग करता येत असेल तर त्यापेक्षा चांगले पुण्य ते काय?