रोहिणी, माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गुलबाक्षीच्या फुलांची देठ गुंफून केलेली वेणी करून तर कित्येक वर्षे झाली! आमच्या इकडे तर गुलबाक्षीचे फूल दिसतच नाही.
माझ्या आजीकडे खड्याच्या गौरी असायच्या. आजोळ गावातच असल्याने कधी कधी त्या बसवायला मी जात असे. तेव्हा तुम्ही आणि वरदाने लिहिले आहे ते सर्व होत असेच पण आजी मला प्रत्येक खोलीत नेऊन "इथे काय आहे?" असे विचारत असे, व त्याचे गौरीतर्फे उत्तर "उदंड आहे." असे मी देत असे.