मलाही अनुचे म्हणणे पटते. माझाही एक(च) प्रतिसाद प्रशासकांनी उडवला होता व त्याचे स्पष्टीकरणही न मागता स्वतःहून कळवले होते. मला ते पूर्णपणे पटलेही होते.
ते आपले इतर व्याप सांभाळून आणि वेळोवेळी सुधारणा करुन स्वखर्चाने मनोगत चालवत आहेत.
यामुळेच त्यांना जे योग्य वाटेल ते ते ठेवतील उरलेले उडवतील, स्थलांतरित करतील. (प्रत्येकवेळी ते त्याचं सुयोग्य स्पष्टीकरण देतात असं मला वाटतं)
ज्यांना जायचंय ते खुशाल जाऊ शकतात आणि जे केवळ स्वतःची जाहिरात करण्यासाठी इथे आले आहेत त्यांच्याबाबत तर बोलायचा प्रश्नच नाही.
घरातील कर्त्या माणसाचा एखादा निर्णय आवडला नाही तर एकवेळ आपण निषेध नोंदवू शकतो पण कर्त्या माणसाच्या त्याच्याच घरातील वागण्याला लुडबुड म्हणू शकत नाही.
साती काळे.