दुटप्पीपणा की अनवधान की अन्य काही?

वेळेचा अभाव हे कारण असावे असे वाटते. मनोगतावर ज्या वेगाने लेख/कविता/प्रतिसाद येतात ते पाहता प्रत्येकवेळी तितक्याच वेळात लिखाणात बदल करणे शक्य होत नसावे. म्हणजे अमुक व्यक्तीचा प्रतिसाद दोन मिनिटात काढला आणि तमुक व्यक्तीचा दोन दिवसांनी काढला, असे होणे शक्य आहे. पण त्यामुळे पक्षपाताची शंका येऊ नये.

असो,  तुमचे

पण प्रशासकांनी तरी एकाच पारड्यात साऱ्यांना तोलण्याचा बाणा असल्याचे दाखवून दिल्याने आनंद झाला! हा भाग साऱ्यांनाच दिलासा देणारा आणि अनुकरणीय ठरावा.

हे वाक्य पाहता, तुमच्या

"तथ्य जुन्या मनोगतींच्याविरुद्ध असले की प्रशासक बडगा उगारतात हे ध्यानात आले आहे" हे खरे आहे असे म्हणायचे काय?

या प्रश्नाचे उत्तर मिळाले असावे असे वाटते.