सणाकडे उत्साहाने साजरा करणे, सर्वांनी एकत्र येणे आणि मजेत राहणे या दृष्टिकोनातून पाहावे असे मला वाटते.
त्यातील कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ लागला, इतरांना त्याचा त्रास होऊ लागला तर त्या बद्दल निषेध / कृती करावी. सणाचा आता उपयोग नाही, बंद करावा इ. उपाय मला पटत नाहीत.
विधायक कामे वर्षभर करता येतात. त्यात सणाच्या दिवशीच्या खर्चाला का आणावे? तो खर्चही समाजात कोणा ना कोणाला फायदा करून देतच असतो. हे मात्र बरोबर की अशा निमित्ताने लोक एकत्र येतात त्यामुळे विधायक कामे घडू शकतात. होत असतील तर उत्तम. पण दोनही पक्षांनी 'अती तेथे माती' लक्षांत ठेवावे असे मला वाटते.
सणावारातील आनंद, उत्साह (सभ्यपणे) उपभोगावा.
आपणा सर्वांना या निमित्ताने गणेशोत्सवासाठी अनेक शुभेच्छा.
--लिखाळ.