रोहिणीताई,
खूपच मस्त लिहिले आहे....आठवणी यायल्या लागल्या त्या दिवसातल्या....मी पण बाबांबरोबर गणपती आणायला जात असे... ती घरी आणलेली मूर्ती इतकी लोभसवाणी दिसायची की त्याकडे बघत राहावे असे वाटायचे....
आमच्याकडे उभ्या (मुखवट्याच्या) गौरी असल्यामुळे आरास, साडी नेसवणे, भोवती रांगोळी, लाडू-करंज्या मांडणे यात कसे दिवस संपायचे कळायचे नाही... मग गौरी विसर्जनाच्या दिवशी कोयरी हळद-कुंकवाने सपाट भरून ठेवायची....दुसऱ्या दिवशी त्यात बोटे उमटली का हे बघायला आम्हा भावंडांची धडपड! या माहेरवाशिणी गौरी जाताना हळदकुंकू लावून जातात असे आजी सांगायची....
खरंच खूप मस्त दिवस असतात ते!!
अंजू